Home लाईफस्टाईल Android, Chrome ला वाचवलं! गुगलकडून भारतीय तरुणाला तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

Android, Chrome ला वाचवलं! गुगलकडून भारतीय तरुणाला तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

222
0

इंदौरमध्ये बग्समिरर नावाची कंपनी चालवणाऱ्या अमन पांडेला गुगलने ३०० चुका शोधून काढल्याबद्दल सुमारे ६५ कोटीं रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडे मूळचा झारखंडचा आहे. त्याने सुरुवातीचे शिक्षण झारखंडमधल्या पत्राटू या छोट्या गावात केले. त्यानंतर तो बारावीपर्यंत शिकण्यासाठी झारखंडमधल्याच बोकारोला गेला. बोकारोच्या चिन्मय शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमनने भोपाळ एनआयटीमधून B.tech पूर्ण केले.

अमनने सांगितले की, त्याने जानेवारी २०२१ मध्ये बग्समिरर नावाची कंपनी सुरू झाली. सध्या मॅनेजमेंट टीममध्ये चार लोक आणि एकूण १५ कर्मचारी आहेत. ते म्हणाले, “आम्ही याची सुरुवात स्टार्टअप म्हणून केली होती. पण जवळपास दोन वर्षांपासून आम्ही गुगलच्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न करत होतो.”

गुगलने कडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम कंपनीच्या भवितव्यासाठी वापरली जाईल

अमनने आतापर्यंत गुगलच्या ३०० हून अधिक चुका सापडल्या आहेत. बगस्मिरर कंपनीत सुमारे १५ कर्मचारी काम करतात. सॅमसंग या कंपनीने सुद्धा चुका शोधून बक्षीसही दिल्याचे अमनने सांगितले आहे. पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की, एवढ्यावरच न थांबता आम्ही एक फंक्शन डेव्हलप करण्याच्या मार्गावर आहोत. प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड केल्यावर हे फीचर उपलब्ध होईल. यामध्ये यूजर्स फीचरवर क्लिक करून, सुरक्षेच्या उद्देशाने ॲप तुमच्यासाठी किती योग्य किंवा चुकीचे आहे हे शोधू शकतील.
गुगलकडून मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेच्या प्रश्नावर, अमनने असं सांगितले की, तो कंपनीला पुढे नेण्यासाठी ही रक्कम वापरणार आहेत. गुगलने आतापर्यंत अनेक बक्षीस पाठवल्याचा दावाही त्याने केला आहे. सध्या अमन अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहे. आयुष्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, पण ध्येय खूप दूर आहे, असं तो म्हणतो.

Previous articleJob Alert : भारतीय नौदलात १५३१ जागांवर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
Next articleMumbai Local : लसीकरण न झालेल्या व्यक्तींनाही लोकल प्रवासाची मुभा दयावी – हायकोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here