Home लाईफस्टाईल आता तरी पर्यावरणाकडे लक्ष द्या ! प्लास्टीकमुळे प्रायव्हेट पार्ट होतोय छोटा

आता तरी पर्यावरणाकडे लक्ष द्या ! प्लास्टीकमुळे प्रायव्हेट पार्ट होतोय छोटा

351
0

कुठे गारा पडताहेत तर कुठे सुर्य आग ओकतोय… हे सर्व का होतेय ? ग्लोबल वॉर्मिंग का होतेय ? पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले आहे म्हणून. प्रचंड प्रमाणात प्रदुषण वाढले आहे. समुद्र प्रचंड प्रमाणात प्लास्टीक बाहेर फेकतोय. आपल्या दैनंदिन वापरात कीती मोठ्या प्रमाणावर प्लास्टीक वापरले जातेय… त्याचेच हे द्योतक. पण, मित्रांनो प्लास्टीक मानवाच्या प्रजननक्षमतेवर दुरगामी परिणाम करत असल्याचे समोर आलेय. पर्यावरणवादी संशोधकांनीच तसा दावा केला आहे. प्रदुषणामुळे मानवी लिंगाचा आकार छोटा होत चालल्याचा दावा डॉ. शन्ना स्वान यांच्या संशोधनातून समोर आले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे जन्माला येणाऱ्या बालकांच्या लिंगाचा आकार छोटा होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. प्रदुषणात प्लास्टीकचा मोठा वाटा असून प्लास्टीकमधील फॅथलेट्स या घटकामुळे मानवी लिंगाचा आकार छोटा झाल्याचा दावा डॉ. स्वान यांनी लिहीलेल्या ‘काऊंट डाऊन’ या पुस्तकातून करण्यात आला आहे. शन्ना या न्यूयॉर्कच्या एका हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असून पर्यावरणपूरक औषधे आणि सार्वजनिक आरोग्य हे विषय शिकवतात.

प्लास्टीकमधील फॅथलेट्स हा घटक माणसाच्या एंडाक्राईन संस्थेवर परिणाम करत असल्याचे डॉ. स्वान यांच्या संशोधनात म्हटले आहे. एंडाक्राईन ही संस्था हॉर्मोन्सची निर्मिती करते. फॅथलेट्सचा वापर प्लास्टीक लवचिक करण्यासाठी होतो. स्वान यांनी म्हटल्याप्रमाणे खेळणी आणि जेवणामध्ये हा घटक मिसळला जात असून मानवाच्या प्रजनन संस्थेला धोका पोहोचवत आहे. परिणामी प्रजनन दरामध्ये संपूर्ण मानवजात संकटाचा मुकाबला करत असल्याचे स्वान यांनी संशोधनात म्हटले आहे. या संशोधनावर स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही चिंता व्यक्त केली असून पुढील पर्यावरण लढ्यात सगळे भेटू असे ट्वीट त्यांनी केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जा हीनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

फॅथलेट्स असा करतो परिणाम

फॅथलेट्स हा घटक अॅस्ट्रोजेन हार्मोन्सची नक्कल करतो आणि त्यामुळे शरीरातील हार्मोन्स निर्मितीची प्रक्रीया बिघडते. याचा नवजात बालकांवर आणि ज्येष्ठांवर परिणाम होत असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

सोशल मीडियावर खळबळ

ही बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर विशेषतः महिला वर्गात प्रचंड खळबळ माजली. अनेक महिलांनी तर पुरूष आता तरी पर्यावरणाकडे लक्ष्य देतील अशा शब्दांत पर्यावरणासाठी संपूर्ण पुरूषजातीलाच जबाबदार धरले आहे.

Previous articleलस घेतल्यानंतरही काळजी आवश्यक; अनेकांना होतोय पुन्हा कोरोनाचा संसर्ग
Next articleमुंबईचा पारा ४० अंशावर, उकाड्याने अंगाची लाही लाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here