टोकियो ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताने एकूण ७ पदकं जिकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. ऑलिम्पिंक स्पर्धेत विजयी स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. पण १९५२ साली भारतासाठी ऑलिम्पिंक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदकं मिळवणारे खाशाबा जाधव मणोत्तरही पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत खाशाबा जाधव यांनी भारतासाठी ऑलिम्पिंक पदकं मिळवले होते. मूळ गावी गोळेश्वरच्या हद्दीजवळ स्मृती स्थळ सोडले तर खाशाबा जाधव यांची स्मृती कुठेही पाहायला मिळत नाही. सरकारने त्यांना मणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करावा, अशी दिवंगत खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियांची मागणी आहे.
खाशाबा जाधव यांना कुस्ती खेळण्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना लाल मातीत त्यांनी अनेक कुस्ती जिंकत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. त्यानंतर जाधव यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पहिल्यांदा ते १९४८ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिंकमध्ये त्यांनी सहभाग घेतला. पण तेथे त्यांना पदकं पटकवता आले नाही. मात्र तेथून परत येताना भारतासाठी ऑलिम्पिंकमध्ये पदकं मिळवणारचं असा ध्यास घेतला.
खाशाबा जाधव यांचा ऑलिम्पिंकपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. त्या काळात परदेश प्रवास करणे सोपे नव्हते. त्यासाठी लागणारी आर्थिक पूंजीही खाशाबा जाधवांकडे नव्हती. परंतु सातासमुद्रापार जाऊन देशासाठी पदकं मिळवणार जाधवांचे ध्येय होते. ध्येयपूर्तीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य खर्डीकर यांनी त्यांचे राहते घर गहाण ठेवून जाधव यांना हेलसिंकी येथे पाठवण्यासाठी कर्ज घेतले होते. त्यामुळे खाशाबा जाधव हेलसिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले.
ऑलिम्पिंक ५२ किलो वजनी गटात खाशाबा जाधव कुस्ती खेळणार होते. यासाठी गोविंद पुरंदरे यांनी जाधवांना कुस्तीचे धडे दिले. लंडन ऑलिम्पिंकचा अनुभव उराशी बाळगून त्यांनी स्वतःला मॅटसाठी सिद्ध केले. हेलसिंकी येथे खाशाबा जाधव ऑलिम्पिंकमध्ये सहभागी झाले. पदकं जिंकण्याच्या ऐतिहासिक दिवसाची अनोखी गोष्ट आहे. स्पर्धेला २-३ दिवस राहिले होते. भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे भारतीय संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद व इतरांनाही शहर बघण्यासाठी भटकंती करायची होती. त्यामुळे सर्व फिरायला निघून गेले. फक्त खाशाबा जाधव मैदानात कुस्तीचे सामने पाहत बसले होते. अचानक ध्यानी मनी नसताना ध्वनी क्षेपकावर खाशाबा जाधव यांचे नाव पुढील सामान्यासाठी घेण्यात आले. जाधव यांना इंग्रजी समजत नव्हते. नाव घेतल्याने कोणीही सोबत नसातना त्यांनी स्वतःला सामन्यासाठी तयार केले आणि मैदानात उतरले. त्यांनी कॅनडा, मेस्किको आणि जर्मनीच्या मल्लांवर मात केली. पूर्व उपांत्य फेरी त्यांची लढत रशियाच्या मेमेदबोयोविरुद्ध होती. या फेरीत रशियाच्या मेमेदबोयोकडून ०-३ ने पराभव झाला. त्यानंतर त्यांचा सामना जपानच्या शोहोची इशी होता तेथे त्यांचा ०-३ असा पराभव झाला. खाशाबा जाधव यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यावेळी जाधवांच्या बाबतीत पंचाचे निर्णय चुकले होते. अस ही काही जाणकारांचे मत आहे. परंतु खाशाबा जाधव यांना इंग्रजी फासरं येत नव्हते आणि सामनाची वेळी व्यवस्थापक सोबत नसल्याने त्यांना स्वतःची बाजू मांडता आली नाही, अशी माहिती संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्यावर लिहिलेल्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ पुस्तकांमध्ये आहे. सुवर्ण पदक जरी पटकवता आले नसले तरी खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिंकमध्ये पहिले वैयक्तिक पदकं जिंकून इतिहास रचला.
भारताच्या क्रीडा क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या खाशाबा जाधव यांचे जीवन प्रवास खडतर राहिला आहे. भारतासाठी कांस्य पदक मिळवून दिल्यानंतरही त्यांना ४ वर्षांनी पोलिस खात्यात नोकरी मिळाली. पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून लागले आणि पुढील २२ वर्षे बढती न मिळताच त्याच पदावर ते कार्यरत होते. खाशाबा जाधव यांची खूप इच्छा होती की, त्यांचा आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाचा अनुभवावरुन त्यांना प्रशिक्षक म्हणून सरकारने त्यांची नेमणूक करावी. मात्र त्यांची इच्छा अपुरीच राहिली सरकारने याची दखल घेतली नाही. अखेर त्यांचा १९८४ मध्ये अपघातामध्ये निधन झाले.
स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिंकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदकं मिळवून देणारे दिवंगत खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ सरकारने त्यांचे ना स्मृती स्थळ तयार केले, ना पुरस्काराला नाव दिले किंवा ना एखाद्या वास्तूला त्यांचे नाव दिले. राज्य सरकारने खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी त्याच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली. परंतु केंद्र सरकारकडून त्याची दखल अद्याप घेतलेली नाही.