मुंबईतील थंडी ओसरली असून मुंबईचे तापमान पूर्ववत झाले आहे. शुक्रवारी कमाल तापान ३२ अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. किमान तापमानाची १७.८ अंश सेल्सिअस नोंद झाली. त्यामुळे मुंबईच्या थंडीला ब्रेक लागला असून मुंबईचे तापमान पूर्ववत होत आहे. राज्यातून थंडीची लाट ओसरली असली, तरी थंडीचा प्रभाव कायम आहे.
गेले चार -पाच दिवस मुंबईकर थंडगार वाऱ्याचा अनुभव घेत होते. मुंबईच्या किमान तापमान १३ – १४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे मुंबईकर स्वेटर, जॅकेट, शाल पांघरूण बाहेर पडताना दिसत होते. काल पासून हे चित्र बदलले पाहायला मिळत आहे. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमान वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईचे तापमान पूर्ववत झाले. शुक्रवारी कुलाबा येथे १९. ५ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ येथे १७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारी नाशिक मध्ये किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस तर राज्यातील इतर भागातही किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आले. उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टीचा प्रभाव विदर्भात जाणवत आहे. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारठणारी थंडी कायम राहणार आहे.
राज्यातील इतर शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे – ८.६
मालेगाव – ८.४
मराठवाडा – १०.८
सोलापूर – ११.७
परभणी – ९.७
उस्मानाबाद – ११.०
जालना – १०.२
जळगाव- ७.३
अहमदनगर – ७.५