Home लाईफस्टाईल One Plus च्या फोन चाहत्यांना धोक्याची घंटा, NORD 2 पुन्हा फुटला

One Plus च्या फोन चाहत्यांना धोक्याची घंटा, NORD 2 पुन्हा फुटला

349
0
वन प्लस फोनचा वापर ठरतोय धोकादायक, युजर्सचा दुसरा फोन फुटला

आजकालच्या स्मार्ट युगात स्मार्टफोन आणि माणसाचे एक अतुट नात तयार झालं आहे. सकाळी उठल्यापासून लोकांना आपला फोन हाताळणयाची सुरुवात होते. हा स्मार्टफोन जास्तीत जास्त आणि लेटेस्ट फिचर्सने भरलेला असावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते. यासाठी फोन कंपन्या अनेक नवनवीन फोन बाजारात आणत असतात. One Plus या कंपनीने आपल्या नॉर्ड २ Nord 2 या फोनला बााजारात आणले.मात्र हा फोन ग्राहकांच्या वापरात असताना दुसऱ्यांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीच्या फोनचाहत्यांना धोक्याची घंटा मानावी लागेल. या फोनबाबत अनेक मतमतांतर बाजारात उठत आहेत.

आज तक या वृत्तवाहीनीने केलेल्या बातमीत ही माहीती समोर आली आहे. शुभम श्रीवास्तवने आपल्या वडीलांसाठी वन प्लस नॉर्ड २ हा स्मार्टफोन घेतला. या फोनचा वापर करत असताना फोनचा स्पोट झाला आहे. अशी माहीती शुभमने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. शुभम वन प्लस या नामांकीत कंपनीवर माझा विश्वास होता, मी स्वत: वन प्लस ७ हा फोनअसा उल्लेख त्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यात त्याच्या वडीलांना कोणताही दुखापत झालेली नाही. ही पोस्ट असून त्यात कोणताही फोटो अथवा व्हिडीओ जोडण्यात आलेला नाही. कालांतराने हे ट्विट त्याने डिलिट केले आहे. ही घटना फार गंभीर असून यामुळे वन प्लसच्या चाहत्यांमध्ये ही धोक्याचीच घंटा मानावी लागेल.

या आधीही फोन स्पोटाती घटना घडली आहे मात्र वन प्लस कंपनीने याबाबत बाह्य घटक कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. मात्र ठोस भुमिका कंपनीने मांडलेली नाही. अशाप्रकारे सॅमसंग कंपनीच्या Galaxy note 7 हा स्पार्टफोन फुटण्याची घटना घडली होती. त्यावर कंपनीने फोन विक्रीवर बंदी घातली. यात सॅमसंग कंपनीला मोठे नुकसान स्विकारावे लागले.

Previous articleऑनलाईन हॅकर्सपासून अकाऊंटमधील पैसे वाचवायचे असतील तर या चार गोष्टींचे करा पालन
Next articleशेख इस्माईलच्या गगनभरारीला काळाने लावला ब्रेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here