बॉलिवूड स्टार शाहरुख खान आपल्या ‘रईस’ चित्रपटात म्हणतो, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बडा धर्म कोई नहीं होता’. पिक्चरमध्ये डायलॉग ऐकायला बरा वाटतो. पण काही लोक असे असतात, जे पैशांसाठी काहीही म्हणजे काहीही करायला तयार असतात. आता बातमीबद्दलच बोलुया की. तिकडे विदेशात एक मुलगी पैशे कमविण्यासाठी चक्क कुत्रा बनलीये. एका वर्षातच तिने कुत्रा बनून कोट्यवधी रुपये कमवलेत. खोटं नाही सांगत आम्ही. तुम्ही Puppy Girl Jenna असं गुगलवर टाकून बघा सगळी कुंडली येतीये बघा.
तर विषय असा आहे की, जेना फिलिप कोरोना काळातल्या लॉकडाऊनमध्ये कंटाळली होती. लॉकडाऊननं नोकरी खाल्ली मग खायाचं काय? आपल्याकडं अनेकांनी वडा-पाव, भाजीचे दुकान सुरु केलते. पण जेनाला काय हे जमलं नाही. मग तिने काय शक्कल लढवली तर टिकटॉकवर कुत्रा बनून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. या व्हिडिओला सुरुवातील तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर जेनाने हे काम प्रोफेशनल पद्धतीने करायला सुरुवात केली.
ते कसं काय? म्हणजे करोड रुपये कसे कमवले
तर झालं असं. जेना एकदम कुत्र्यासारखी स्वतःला पट्टा बांधती. कुत्र्यागत खाती, पिती. कुत्र्यागत हिंडतीसुद्धा. सुरुवातीला सर्वांना फ्रीमध्ये शो दाखवल्यानंतर जेनाने Only Fans नावाच्या साईटवर आपलं अकाऊंट खोललं. या साईटवर ती पुर्ण व्हिडिओ टाकते. त्याच व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या अकाऊंटवर टाकला जातो. मात्र तिथूनही तो डिलीट केला जातो. असं का?
तर लोकांनी तिचे पुर्ण व्हिडिओ बघावेत यासाठी जेनी त्यांना ओन्ली फॅन्सच्या साईटवर बोलवते. इथून सुरु होते जेनीची कमाई. या साईटवर जेनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी महिन्याला २० डॉलर भरावे लागतात. विशेष म्हणजे खूप सारे लोक पैसे भरून हे व्हिडिओ पाहतात.

आता रस्त्यावर डॉग फाईट सुद्धा सुरु केली
आधी घरात व्हिडिओ काढण्याचा सिलसिला आता रस्त्यावर आलाय. जेनीने एका दुसऱ्या मुलीसोबत कुत्र्याची नक्कल करत फायटिंग करण्याचा व्हिडिओ रिलीज केलाय. एका ट्विटर हँडलवर या व्हिडिओची झलक पाहायला मिळतेय. जेनी आपल्या मालकासोबत जात असताना रस्त्यात तशीच एक दुसरी मुलगी कुत्रा बनून तिच्यावर भुंकते. त्यावर जेनी देखील तिच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करते.
— Kev (@klew24) January 6, 2022
जेनाच्या या नवीन व्हिडिओवर मात्र अनेक लोकांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लोकांनी पैशांसाठी काहीही करायला सुरुवात केली आहे”, अशी कमेंट एकाने केलीये. “तर जग कोणत्या आणि कुठल्या दिशेने चाललंय”, अशी खंत काही लोक व्यक्त करतायत. तर काही मस्तीखोर लोकांनी कमेंट केलीये की, “या कुत्र्यांना आणखी ट्रेनिंगची गरज आहे, यांना बाहेर कुणी सोडलं?”
काही असो, पण जेनी मात्र हे काम एन्जॉय करतेय. जेव्हा तिने जॉब सोडून पुर्णवेळ हे काम करायचं ठरवलं, तेव्हाच ती म्हणाली होती की, तिला आधीपासूनच कुत्र्यासारखी नक्कल करायला आवडत होतं. जेनीचे व्हिडिओ जास्त पाहण्यामागचे कारण असे की, त्यातून काही लोकांना विकृत आनंद मिळत असल्याचे सांगितले जाते. खरं खोटं माहीत नाही, पण जेनीने मात्र चांगलीच कमाई केलीये.