सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या अॅप्सचा वापर केला जातो. हे अॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे की, सामान्य फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा वापर करून पेमेंट करू शकतील. फीचर फोन यूजर्ससाठी आरबीआयने यूपीआय आधारित पेमेंट्स प्रोडक्ट्स आणले आहे. आरबीआयने UPI आधारित 123Pay ही सुविधा फीचर फोन यूजर्ससाठी लाँच केली आहे. UPI123Pay सुविधेच्या माध्यमातून फीचर फोन यूजर्स स्मार्टफोन यूजर्सप्रमाणेच डिजिटल पेमेंट करू शकतील.
या सुविधेच्या माध्यमातून यूजर्सला छोटी रक्कम सहज पाठवता येईल. आरबीआयने डिजिटल पेमेंट्ससाठी २४x७ हेल्पलाईन डिजीसाथीला देखील लाँच केले आहे. या हेल्पलाइनद्वारे यूजर्सला शिक्षित व जागरुक केले जाईल. स्मार्टफोनच्या तुलनेत फीचर फोनमध्ये कमी फीचर्स मिळतात. फीचर फोनचा प्रामुख्याने वापर कॉल आणि टेक्स्ट मेसेजसाठी केला जातो. परंतु, आता फीचर फोन यूजर्स विना इंटरनेट डिजिटल पेमेंट करू शकतील. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, फीचर फोन यूजर्ससाठी डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे खूपच महत्त्वाचे आहे. फीचर फोन यूजर्स एसएमएसच्या माध्यमातून पेमेंट करू शकतील व यासाठी इंटरनेट कनेक्शनची देखील गरज नाही.
Launch event and inaugural address by RBI Governor-UPI for feature phones & 24*7 helpline https://t.co/lziWBh0BzR
— ReserveBankOfIndia (@RBI) March 8, 2022