देशात नवे आर्थिक वर्ष १ एप्रिल पासून सुरु होते. नव वर्षात पदार्पण करताना अनेक गोष्टीमध्ये बदल होतात. यावर्षी पदार्पण करताना सामान्यांच्या खिशाला कातरं लावली आहे. आता देशात मोबाईलफोन, टीव्ही, बाईक-कार, एसी, स्टिल, फ्रिज, कुलर अशा वस्तू तसेच विमान प्रवासही महागणार आहेत. कोरोनामुळे बंद झालेल्या उद्योगधंद्यांचा हा परिणाम आहे. यातून कोणत्या गोष्टी महागणार हे जाणुन घ्या.
मोबाईल फोन महागणार
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोबाईल फोन महागणार असल्याची घोषणा केली आहे. फोनवर इमोर्ट ड्युटी वाढवण्यात येणार असून यातून फोनन्सच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. तसेच चार्जर, ए़़डाप्टर, आणि मोबाईल बॅटरी ही साधनेही महागणार आहेत.
वाहनांच्या किंमतीत वाढ
बाईक-कारच्या किंमतीमध्येही आजपासून वाढ होणार आहे. वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या मारूती आणि निसान कंपनी तसेच अनेक वाहन निर्मिती कंपन्यांची वाहनांच्या दरात वाढ करणार असल्याचे सांगितले होते. परंतु किती वाढ होणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
टीव्ही महागणार
टीव्ही आणि इलेक्ट्रोनिक वस्तुंच्या दरात २ ते ३ हजार रुपयांची वाढ होणार आहेत. चीनी वस्तुंच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे इलेक्ट्रोनिक वस्तू महागल्या आहेत.
स्टील
कोरोना काळानंतर स्टिलच्या दरात वाढ झाली आहे. परंतु आता पुन्हा एकदा तुम्हाला अधिक किंमत द्यावी लागणार आहे. कच्चा मालाच्या किंमती वाढल्या असल्यामुळे उत्पादनात घट झाली असल्याने दरात वाढ झाली आहे.
AC,फ्रिज आणि कूलर दरवाढ
AC,फ्रिज आणि कूलरसाठी १ एप्रिलपासून अधिक किंमत द्यावी लागणार आहे. कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्यानंतर कंपन्यांची एसी, कूलरच्या दरात अधिक वाढ केली आहे.
विमान प्रवास
देशात १ एप्रिलपासून सरकारने देशांतर्गत विमान प्रवास करण्याच्या भाड्यात ५ टक्के वाढ केली आहेत. तसेच एयरपोर्ट सिक्योरिटी फी देखील देशांतर्गत प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.