Home लाईफस्टाईल ओमिक्रॉन की ओमायक्रोन : वाचा, या विषाणूला नाव दिल्याची रंजक कथा

ओमिक्रॉन की ओमायक्रोन : वाचा, या विषाणूला नाव दिल्याची रंजक कथा

जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोनाच्या या नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव कसे देण्यात आले ? याबद्दल जाणून घेऊ या. ..

338
0

जगभरात Omicron या कोरोनाच्या नव्या विषाणूने दहशत निर्माण केली आहे. आता पर्यंतच्या विषाणूंपेक्षा ओमिक्रॉन अत्यंत वेगाने संसर्ग पसरवणारा आहे. मात्र कोरोनाइतका तो घातक नससल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव कसे देण्यात आले. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आतापर्यंत जगभरात कोरोनाचे विविध विषाणू सापडले. या विषाणूंना जागतिक आरोग्य संघटना वैज्ञानिक नाव देते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक कार्यप्रणाली ठरवली आहे. त्यानुसार नवीन विषाणूंना नाव दिले जाते. सुरुवातीला देशात सापडणाऱ्या विषाणुंना त्या त्या देशानुसार नाव दिली जात होती. उदाहणार्थ युके व्हेरिएंट, इंडियन व्हेरिएंट. पण यामुळे अनेक वाद निर्माण होत होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशावरून नाव न ठरवता ग्रीक अक्षरांवरून कोरोनाच्या नवीन विषाणूंना नाव देण्याचे ठरवले. आता कोरोनाचा नवा विषाणूचे ओमिक्रॉन हे नाव देखील ग्रीक अक्षरावरून देण्यात आले आहे. पण त्यासाठी ओमिक्रॉनच्या आधीची दोन ग्रीक अक्षरे वगळण्यात आली.

व्हेरिएंट ऑफ कन्सर्न, अल्फा, बिटा, कामा, डेल्टा यावरून कोरोनाच्या विविध विषाणूंना नाव दिली जातात. ओमिक्रॉन हे नाव ग्रीक अक्षर असून त्या आधीची दोन अक्षर वागळ्यात आली. त्यामागील कारण जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केली आहेत. ‘एमयू’ (mu) आणि ‘शी’ (xi) ही वगळ्यात आलेली अक्षरे आहेत. एमयू उच्चार करताना ‘न्यू’ (new) असा होतो. न्यू व्हेरिएंट अस म्हटले गेले असते पुन्हा नवा विषाणू आला असा गोंधळ झाला असता. तर शी हे चीनमध्ये अनेकांचे आडनाव आहे तसेच चीनचे राष्ट्राध्यक्षांचे नाव शी जिनपिंग आहे. त्यामुळे चीन देशाच्या भावना दुखावल्या जाऊन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून ही दोन्ही अक्षर बाद करून ओमिक्रॉन हे नाव नव्या विषाणूला देण्यात आले.

ओमिक्रॉन या सार्स- कोव्ह-2 (SARS-CoV-2) चा नवा प्रकार असून, तो दक्षिण आफ्रिकेत सापडला. त्याला B.1.1.529 किंवा ओमिक्रॉन असे नाव देण्यात आले.
या प्रकारच्या विषाणूचे म्युटेशन्स म्हणजेच, उत्परीवर्तन अत्यंत जलद गतीने होते असल्याचे आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन हा कोरोनाचा व्हेरीएंट ‘काळजीचे कारण’ (VoC) असल्याचे जाहीर केले आहे.

Previous articleजयंतीः १८५७ च्या उठावातील महानायिका आणि झाशीची वीरांगना झलकारी बाई
Next articleBMC ने रेल्वे रुळाखालील पाण्याची मोठी गळती रोखली; आव्हानात्मक परिस्थितीत केलं काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here