Home लाईफस्टाईल २२ महिन्यांच्या पोराचा कारनामा! आईचा मोबाईलमधून उडवले १.४ लाख रूपये!

२२ महिन्यांच्या पोराचा कारनामा! आईचा मोबाईलमधून उडवले १.४ लाख रूपये!

196
0

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये अयंश कुमार नावाच्या २२ महिन्यांच्या एका मुलाने मोबाईलवर खेळता-खेळता असा खेळ खेळला की त्याच्या पालकांना १ लाख ४० हजार रूपयांचा फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाने मोबाईल वर व्हिडिओ गेम्स खेळत होता. एकेदिवशी त्याने त्याच्या आईद्वारे वॉलमार्टच्या शाँपिंग कार्टमध्ये ठेवलेले सामान ऑनलाईन ऑर्डर केले. जेव्हा फर्निचरची डिलिव्हरी घरी पोहोचली, तेव्हा त्याच्या पालकांना या खरेदीची माहिती मिळाली, आणि आपल्या मुलाने केलेल्या या कारनाम्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं.

मोबाईल हाताळण्यात एक्स्पर्ट

अयंश कुमार हा दोन वर्षाचा आहे. अयंशची आई तो नेहमी शांत बसावा यासाठी त्याला मोबाईल देत असे. मोबाईलमध्ये मग्न असणारा अयंश मग चलबिचल थांबवून शांत बसतो. मात्र अयंशने ऑर्डर केलेल्या सामानानंतर त्यांची पाचावर धारण बसली. अयंश हा अमेरिका स्थित भारतीय वंशाच्या मधु कुमार व प्रमोद कुमार या दांम्पत्याचा मुलगा आहे. अयांशला अजूनसुद्धा लिहायला व वाचायला येत नाही मात्र तरीही तो मोबाईल हाताळण्यात तो एक्स्पर्ट आहे.

नव्या घरात पोचलं फर्निचरचं पार्सल

कुमार दांम्पत्य नुकतंच त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झालं होतं. त्यासाठीच अयांशची आई मधु कुमार त्यांच्या नव्या घरासाठी फर्निचरचे सामान पाहत होती, जे तिने वॉलमार्टच्या वेबसाईटवर कार्ट मध्ये अॅड करून ठेवलं होतं. मात्र जेव्हा त्या सामानाची डिलिव्हरी घरी पोहोचली, तेव्हा त्याचे पालक हैराण झाले. मधुकुमार यांनी आपल्या पतीला व आपल्या दोन मोठ्या मुलांना या सामानाच्या डिलिव्हरीबद्दल विचारले असता, त्यांनी ते सामान न घेतल्याचे सांगितले. शेवटी मग त्यांना अयांशवर संशय आला जो शेवटी सत्यात उतरला.

पालकांनी घेतला हा निर्णय

प्रमोद कुमार यांनी सांगितले की, मला या गोष्टीवर विश्वास ठेवायला कठीण होत आहे, मात्र हे सत्य आहे. आता प्रमोद व मधु कुमार फर्निचरचे सर्वही बॉक्स येण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर ते सर्वही सामान लोकल वॉलमार्टला परत करून पूर्ण रिफंड घेतील. शक्य असल्यास अयांश याने केलेल्या पहिल्या शॉपिंगची आठवण म्हणून काही वस्तू ठेवण्याचाही मानस अयांशचे वडिल प्रमोद कुमार यांनी व्यक्त केला आहे.

Previous article“झुकेगा नहीं साला” कर्नाटकच्या शेतकऱ्याने अर्ध्या तासात घेतली १० लाखाची गाडी
Next articleमहाराष्ट्राला भरणार हुडहुडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here