Home लाईफस्टाईल Free WiFi: लोकलमध्ये मिळणार फ्री वायफाय, रेल्वेच्या Content On Demand सुविधेचा शुभारंभ…

Free WiFi: लोकलमध्ये मिळणार फ्री वायफाय, रेल्वेच्या Content On Demand सुविधेचा शुभारंभ…

197
0

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात कंटाळा येणार नाही. त्याचं कारण म्हणजे रेल्वेने आता प्रवाशांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेतली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळातर्फे आजपासून मुंबई लोकलमध्ये कंटेंट ऑन डिमांड ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला लोकल प्रवासादरम्यान आपल्या मोबाईलवर चित्रपट पाहणं, विविध शोज् पाहणं, शॉपिंग करणं हे शक्य होणार आहे, तेही विना इंटरनेट, आणि अगदी मोफत!

मध्य रेल्वेमार्फत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरसुद्धा सदर नव्या योजनेची माहिती देण्यात आली आहे –

नेमकी ही यंत्रणा काम कशी करणार?

आपल्याकडे इंटरनेटचा रिचार्ज नसेल, मोबाईलला नेटवर्क नसेल तरीही आपण Content Conjunction च्या द्वारे या यंत्रणेचा वापर करु शकतो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळ आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने इन-ट्रान्झिट तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य झालं आहे. प्रवासी आता त्यांच्या प्रवासात डिजिटल सेवांचा अखंड लाभ घेऊ शकतात. मुंबई विभागीय मंडळ (Central Railway Mumbai Division) आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स (SugarBox Networks) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेली ही सेवा जगातील पहिली हायपरलोकल एज क्लाउड प्लॅटफॉर्म सेवा आहे.

प्रवाशांना ही सेवा वापरण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये शुगरबॉक्स SugarBox हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर मोबाईलचा वायफाय (WiFi) चालू करुन नेटवर्कला कनेक्ट केल्यानंतर या ॲपमधील डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल. या सुविधेचा शुभारंभ आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSTM) या रेल्वे स्थानकावर करण्यात आला. याप्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, शुगरबॉक्स नेटवर्कचे सह-संस्थापक रोहित परांजपे, रिपुंजय बररिया आणि देवांग गोराडिया तसेच मुंबई विभागाचे डीआरएम शालभ गोयल, आणि इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.

ही सुविधा कशी वापराल?

१) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरुन शुगरबॉक्स हे ॲप डाऊनलोड आणि इंस्टॉल करावे.

२) ॲपला लोकेशनची परवानगी द्यावी.

३) आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा, त्यानंतर ओटीपी आपल्याला एसएमएसद्वारे मिळेल, तो टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.

४) आता आपले वायवाय चालू करुन शुगरबॉक्स या नेटवर्कला कनेक्ट करावे.

५) वायफाय शुगरबॉक्स नेटवर्कला कनेक्ट झाल्यानंतर या सेवेचा लाभ घेता येईल, मात्र केवळ शुगरबॉक्स ॲपमधील कंटेंट पाहता येईल बाकी पूर्ण इंटरनेट वापरता येणार नाही.

ही सुविधा कुठे-कुठे मिळेल?

ही सुविधा सुरूवातीला मेन लाईन वरील १० लोकलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. उर्वरित १५५ लोकलमध्ये टप्प्या-टप्प्याने ती उपलब्ध करून दिली जाईल. ट्रेनमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारा वायफाय नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मेन लाईन वर सीएसटीएम-कल्याण/ कर्जत/ कसारा मार्गावरील लोकलवर ही सोय मिळेल.

Previous articleATM कार्डला पिन म्हणून ठेवली जन्मतारिख, झाले ७५ हजार गायब.
Next articleIPL लिलावात शार्दुल चमकला, अजिंक्यचा भाव घसरला; वाचा मराठी पोरांनी किती कमावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here