सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पाटणा उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. पाटणा उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादींसह अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. ८ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १५९ पदांची भरती केली जाणार आहे.
या पदासाठी अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : ८ मार्च
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मार्च
एकूण रिक्त जागांचा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १५९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. ही पदे स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर कम टायपिस्टची आहेत. स्टेनोग्राफर गट क ची १२९ पदे आणि संगणक परिचालक सह टंकलेखक गट क ची ३० पदांसाठी भरती करण्यात येत आहेत.
अर्ज भरण्यासाठीचे शुल्क
UR/EWS/EBC/BC : १००० रुपये
SC/ST/OH : ५०० रुपये
निवडलेल्या उमेदवारांना मिळणारा पगार
तुमची पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना या पदांबद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास तुम्ही पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, इंग्रजी शॉर्टहँड-संगणक टायपिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
पात्रता आणि वयाची अट
पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलताना, स्टेनोग्राफर पदांसाठी १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी १८ते ३७ वर्षे वयोमर्यादा आहे.