Home लाईफस्टाईल इंडियन आणि चायनीज मिळून बनलेत ‘चिंडियन’; स्वतःची ओळख जपण्याची मजेशीर गोष्ट

इंडियन आणि चायनीज मिळून बनलेत ‘चिंडियन’; स्वतःची ओळख जपण्याची मजेशीर गोष्ट

मलेशियामध्ये दोन वंशांतील आंतरधर्मीय व आंतरदेशीय विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना 'चिंडियन' म्हणून संबोधले जाते. यामध्ये भारतीय आणि चीनी वंशियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

480
0

प्रत्येक देशाच्या नागरिकास तिथल्या देशाच्या नावावरुन ओळखळं जातं. अमेरिकेचे अमेरिकन्स, इंडियाचे इंडियन्स, चीनचे चायनीज, श्रीलकंचे श्रीलंकन… अशा विविध नावानं त्या त्या देशातल्या लोकांना ओळख मिळत असते. मात्र आशिया खंडात काही देश असे आहेत. जिथे त्या देशातील नागरिकांव्यतिरीक्त स्थलांतरीत लोकांचीही संख्या बऱ्यापैकी आहे. मुलनिवासी आणि स्थलांतरीत नागरिकांच्या संकरातून जी नवी पिढी जन्मास आलेली आहे, त्या पिढीसमोर स्वतःच्या आयडेंटीटीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आशिया खंडातील मलेशिया आणि सिंगापूरमध्ये अशा लोकांची संख्या मोठी आहे. या दोन देशात चिंडियन नावाची संकल्पना उद्यास आली असून. या लेखात आपण या मजेशीर संकल्पनेबाबत जाणून घेऊया.

‘चिंडियन’ हा शब्द समाज माध्यामातून ऐकण्यास आलेला असेलच. ‘चिंडियन’ हे एखाद्या पदार्थाचे नाव आहे का? चीनशी काही संबंधित आहे? ‘चिंडियन्स’ आणि ‘इंडियन’ यांचा एकमेकांशी संबंध आहे का? ‘चिंडियन’ हा शब्द ऐकून असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ‘चिंडियन’ ही मलेशियामध्ये उदयास आलेली नवी कम्युनिटी असून तिचा भारताशी जवळचा संबंध आहे. भारताशी संबंधित आहे असे ऐकून आश्चार्य वाटते ना.. मलेशियामध्ये ज्या भारतीयांशी चीनी वंशियांशी लग्न झाले. त्यांना झालेल्या अपत्यांना त्यांची नेमकी ओळख काय, असा प्रश्न पडू लागला. त्यातूनच या नव्या पिढीने स्वतःचे चिंडियन म्हणून नवी ओळख निर्माण केली.

‘चिंडियन’ कम्युनिटी मलेशियाबरोबर सिंगापूरमध्ये मोठ्याप्रमाणात आढळते. फार पूर्वीपासून भारतीय लोक नोकरी, व्यवसायांसाठी परदेशात जात असत. कालांतराने ते त्या ठिकाणीच स्थायिक झाले. तसेच चीनमधून चीनी लोक उद्योगधंद्यांसाठी मलेशिया, सिंगापूर व अन्य देशात स्थायिक झाली. मलेशिया व सिंगापूर यांसारख्या देशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांची चीनीवंशियांची लग्न झाली. अशा दोन वंशांमधून जन्माला आलेल्या अपत्यांना स्वतःची नेमकीओळख काय या बद्दल संभ्रम निर्माण झाला. वडिल भारतीय तर आई चीनची जन्म मात्र मलेशिया किंवा अन्य देशाचा त्यामुळे त्यांना नागरिकत्व आणि ओळख मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. ‘ना घर का ना घाट का’ अशा परिस्थितीला तेथील या नव्या पिढीला समोरे जावे लागत होते. या नवीन पिढीने यातून सुवर्णमध्य काढून ‘चिंडियन’ ही स्वतःची नवी ओळख निर्माण केली. दोन वंशांतील आंतरधर्मीय व आंतरदेशीय विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना ‘चिंडियन’ म्हणून संबोधले जाते.

मलेशियामध्ये अशा आंतरविवाहामध्ये सहसा भारतीय पुरुष आणि चिनी महिलांचा समावेश असतो. म्हणून मलेशियन सरकारने बहुसंख्य चिंडियन अपत्यांना ‘मलेशियन भारतीय’ म्हणून वर्गीकृत केले आहे. सिंगापूरमध्येही भारतीय पुरुष आणि चीनी महिलांचे आंतरदेशीय व आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणात होतात. या ठिकाणीही चिंडियनची संख्या जास्त आहे.
आई चीनी वंशीय तर वडिल भारतीय तर कधी वडिल चीनी तर आई भारतीय असते. तसेच कधी वडिल मलेशियन किंवा अन्य धर्मांचे असतात. चीनमध्ये पूर्वीपासून बौद्ध धर्माचा प्रसार झाला. तसेच भारतातही बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. त्यामुळे बऱ्याचदा दोन्ही कडील धार्मिक संस्कृती साधर्म्य आढळून येते. दोन वंशांतून निर्माण झालेली नवीन पिढीवर दोन्हीकडील संस्कृतीचा प्रभाव पाहण्यास मिळतो. हाच प्रभाव त्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये दिसून येतो.

Previous articleरायगडच्या पालकमंत्र्यांनी दिलं साक्षी दाभेकरला अनोखं बळ, जाणता राजाच्या भुमिकेतून दिली संघर्षाची ऊर्जा
Next articleव्हॉट्सअ‍ॅपवरून डाऊनलोड करा लसीकरण प्रमाणपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here