Home लाईफस्टाईल वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय तर आता करा ‘वर्क फ्रॉम नेचर’

वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय तर आता करा ‘वर्क फ्रॉम नेचर’

297
0
MTDC ROOM
वर्क विथ नेचर साठी mtdc ने दिली मोफत वायफायची सुविधा

पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सध्या पुणे विभागातील रिसॉर्टवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ उपक्रम सुरु केला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाने अनेकांना आपल्या ऑफिसमधून वर्क फ्रॉम होम ही सुविधा सुरु केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि विविध क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनासाठी इच्छूक असतात. मात्र काहींना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे पर्यटनासाठी बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी एमटीडीसी रिसॉर्टवर वायफाय झोनची मोफत सुविधा देण्यात आली आहे. एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही ही सुविधा देण्यात येत आहे. चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे यातून शक्य झाले आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर रिसॉर्टवरही ही सुविधा होणार आहे.

MTDC ROOM
वर्क विथ नेचर साठी mtdc ने आणली मोफत वायफायची सुविधा

यासंदर्भात अधिक माहिती देताना एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे म्हणाले की, वर्क फ्रॉम नेचर सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्टवर सुरु केली आहे. पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरु होईल. तथापि, पर्यटकांनी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेत एमटीडीसी पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोनाबाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येईल. निसर्गाचे भान ठेवून आणि कोरोनाबाबत दक्षता घेवून पर्यटन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

MTDC ROOM
वर्क विथ नेचर साठी mtdc ने आणली मोफत वायफायची सुविधा

आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि रिसॉर्ट बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा. कोरोना विरोधातील लढाईचा भाग म्हणून एमटीडीसी रिसॉर्टवरील पात्र कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Previous article‘राम’ चा RRR मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
Next articleलस घेतल्यानंतरही काळजी आवश्यक; अनेकांना होतोय पुन्हा कोरोनाचा संसर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here