Home राजकारण “टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच” जयंत पाटीलांनी आपलं वक्तव्य खरं करून दाखवलं..

“टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच” जयंत पाटीलांनी आपलं वक्तव्य खरं करून दाखवलं..

सांगली-मिरज-कुपवाड मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा झेंडा रोवण्यात जयंत पाटील यांना यश मिळाले. भाजपाची सहा मते फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला यश मिळाले आहे. बहुमत असूनही भाजपाला सत्ततून वंचित रहावे लागल्याने ही हार भाजपला महाग पडली आहे.

770
0

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकराने राज्यातून भाजपला हद्दपार करण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. तसेच आज सांगली-मिरज-कुपवाड मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. या विजयानंतर


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुप्रसिद्ध वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही. ‘आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’  असे जयंत पाटील एका मुलाखतीत म्हणाले होते. याचा प्रत्यय आला सांगली-मिरज-कुपवाड मनपा निवडणुकीत आला आहे. सर्वाधिक जागा असणाऱ्या भाजपला खिंडार पाडून जयंत पाटील यांनी हा विजयाची बाजी मारली आहे.  


या महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते.

राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.

Previous articleबांदेकर दांपम्त्याच्या मुलाचे कलाविश्वात पदार्पण
Next articleसांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ – नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here