Home राजकारण मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची ?

मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची ?

मुंबई महानगरपालिकेने वॉर्ड पुनर्रचनेचा प्रारूप आरखडा केला जाहीर

153
0

आज मुंबई महानगरपालिकेने वॉर्ड पुनर्रचनेचा प्रारूप आरखडा जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढवण्यात आले. मुंबई शहर विभागात तीन, पूर्व उपनगरात तीन आणि पश्चिम उपनगरात तीन असे एकूण तीन प्रभाग वाढवण्यात आले. २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात शिवसेनेने सत्ता काबीज केली होती. आता होणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रभाग वाढवण्याचा फायदा शिवसेनेला की भाजपला होणार, हा चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन बदल केलेल्या प्रभाग रचनेचे केलेले हे विश्लेषण.

मुंबई मनपात नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे. वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यावर हरकती आणि सूचना नोंदवल्या जाणार आहेत. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मनपा नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिवाळीपूर्वी घेतला होता.

२०१७ च्या मनपा निवडणुकीत शिवसेनेने ८४, भाजपाने ८२, कॉंग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर १४ जागा जिंकल्या होत्या. खरी चुरस शिवसेना व भाजपामध्ये पाहायला मिळाली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र्य लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आता होणाऱ्या मनपा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मैदानात उतरतील. प्रभाग वाढण्याचा फायदा शिवसेनेला की भाजपला हे पाहणे येणाऱ्या निवडणुकीत औत्सुकाचे ठरेल.

या प्रभागांमध्ये होणार वाढ
वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला चेंबूर गोवंडीत प्रभाग वाढणार आहेत. एकूण जागांच्या ५० टक्के महिला आरक्षण म्हणजे १०९ जागा महिलांसाठी राखीव असतील. तर खुल्या प्रवर्गासाठी ११० जागा आहेत.

Previous articleचहा, कॉफी व मसाल्यांसंबंधीचे ब्रिटिशकालीन कायदे, केंद्र सरकार रद्द करणार!
Next articleमध्य रेल्वेवर तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here