राज्याच्या नुकत्याच नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहराची निवडणुक लक्षणीय ठरली आहे. राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे संपूर्ण निकाल आज स्पष्ट झाले. यात अनेक ठिकाणी चूरस पहालया मिळाली. भाजपच्या एका पठ्याने या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. शून्य मत मिळवून उमेदवाराला स्वताचे मतही मिळाले नाही ही मजेची गोष्ट ठरली आहे.
तर नेमकी निवडणुक झाली कशी?
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गोंडपिपरी शहराची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या तालुक्यात दोन सख्या जावा एकमेकांच्या विरोधात उभ्या राहील्या होत्या. तर कार्यकर्त्यांना केलेल्या सात किलो मटणाची मेजवानीच कोणी लंपास केली. यातच मनोरंजक निवडणुक ठरली ती भाजपचे उमेदवार जितेंद्र इटेकर यांची. इटेकर हे भाजपाचे कार्यकर्ता आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागितली असताना पक्षाने त्यांना नकार दिला. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला निवडणुकीचा अर्ज दाखल केला. असे करूनही त्यांना एकही मत मिळालेले नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी स्वताचा प्रचार करण्यावर कानाडोळा केला. तसेच स्वताचे मतही त्यांनी स्वताला दिले नाही. यातूनच शून्य मतदान मिळणारे राज्यातील पहिले उमेदवार ठरले आहेत.