देशाच्या सर्वोच्च असा संसदेत लोकहिताचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्राईम पॉईंट फाऊंडेशन ही संस्था खासदारांच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेत असते. १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदेमधील ११ खासदारांपैकी महाराष्ट्रातील चार खासदारांनी राज्याची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. यापैकी खा. सुप्रिया सुळे (Supiya Sule) यांनी आठव्यांदा संसदरत्न पुरकस्काराच्या मानकरी ठरणार आहेत. याआधी सातवेळा सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार (sharad Pawar) यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग, सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर साधलेला निशाणा, राज्यातील मांडलेल्या लक्षवेधी अशा विविध नाविण्यपूर्ण कामगिरीतून खासदार सुप्रिया सुळे यांना आठव्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्राईम पॉईंट फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, संसद रत्नाने सन्मानित करणाऱ्या ११ खासदारांपैकी लोकसभेतील आठ खासदार आणि राज्यसभेतील तीन खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण चार खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार फौजिया खान, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाच्या खासदार हिना गावित यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा टिकवून देशाच्या राजकारणात प्रेरणा देणारी कामगिरी यातून झाली आहे.
सुप्रिया सुळे यांची १७ व्या लोकसभेतील कामगिरी
संसदेत उपस्थिती :- ९२ टक्के
चर्चा सत्रांमधील सहभाग :- १६३
उपस्थित केलेले प्रश्न :- ४०२
मांडलेले खासगी विधेयके :- ८
अभिनंदन ताई