Home राजकारण ‘दोन दिवसांत माफी मागा’, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा भाजपला अल्टिमेटम

‘दोन दिवसांत माफी मागा’, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा भाजपला अल्टिमेटम

445
0
hasan mushrif
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

भाजप पक्षाच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची खरडपट्टी काढली आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने अशाप्रकारची टिका-टिप्पणी केली असती तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र भाजपच्या माध्यमप्रमुखाने असे अश्लाघ्य ट्विट करणे योग्य नाही. नवीन कुमारच्या वक्तव्याबद्दल भाजपने दोन दिवसांत माफी मागून दिलगीरी व्यक्त करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस देखील जशास तसे उत्तर देणार, अशा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला.

नवीन कुमार यांच्या ट्विटनंतर भाजपकडून त्याची दखल घ्यायला हवी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे ममता बॅनर्जीच्या मागे लागल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. पण राज्यातील नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तरी नवीन कुमारच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करायला हवा होता. मात्र त्यांनी तो केला नाही, अशी टीकाही हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली.

“सचिन वाझे यांनी एनआयएच्या समोर असा कोणता खुलासा केला, ज्यामुळे शरद पवार यांच्या पोटात अचानक दुखायला लागले. दुखणं एवढं वाढलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. असं वाटतंय की दाल मे कुछ काला नाही बल्की पुरी की पुरी दाल ही काली है”, असे ट्विट नवीन कुमार यांनी २९ मार्च रोजी केले होते.

Previous articleबेड मिळत नव्हता म्हणून ऑक्सिजन लावून केलं आंदोलन; बेड मिळूनही झाला मृत्यू
Next articleमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या कुटुंबाचीच जबाबदारी पेलवली नाही, म्हणून सर्व पॉझिटिव्ह – नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here