
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतात भयंकर प्रकोप केला आहे. पहिल्या लाटेपेक्षाही जास्त जीवितहानी दुसऱ्या लाटेत पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताला मृत्यूचा तांडव पाहावा लागत असल्याची टीका जगभरातून झाली. देशातही विरोधी पक्ष आणि स्वतंत्र विचारांच्या लोकांनी सरकारवर टीका केली. मात्र त्या टीकेला भाजपने भिक घातली नाही. मात्र सध्या एका १४ ओळींच्या कवितेने सरकारला चांगलंच जेरीस आणलंय. गुजरातच्या प्रसिद्ध लेखिका, गीतलेखक पारुल कक्कड यांनी गुजराती भाषेत लिहिलेल्या एका कवितेने देशभरात खळबळ उडवून दिलीये. या कवितेचे इतर भारतीय भाषेतही भाषांतर झाले असून त्या कवितेला उचलून धरण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उत्तरेतील राज्यांमध्ये चांगलाच कहर माजवला. खासकरुन दिल्ली शेजारी असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनामुळे अनेक मृत्यू झाले. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागा उरली नसल्यामुळे गंगा नदीत शव फेकण्यात आले. काही ठिकाणी गंगेच्या किनाऱ्यावरच मृतदेह पुरण्यात आले आहेत. अनेक माध्यमांनी याची बातमी केलेली आहे.
भावगीत लिहिणाऱ्या लेखिका म्हणून गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेल्या पारुल कक्कड यांनी देशातली ही अगतिकता आपल्या कवितेतून व्यक्त केली. तुमच्या रामराज्यात गंगा शववाहिनी बनली असल्याची जहरी टीका या कवितेतून करण्यात आली होती. या कवितेचे हिंदीत भाषांतर झाल्यानंतर कविता वेगाने व्हायरल झाली. पारुल यांनी फेसबुकवर मुळ गुजराती कविता पोस्ट केली होती. त्या कवितेखाली मोदी भक्तांनी तब्बल २८ हजार शिव्यांची लाखोली पारुल यांना वाहिली होती. त्यानंतर पारुल यांनी नाईलाजाने आले फेसबुक अकाऊंट बंद केले.
View this post on Instagram
एक साथ सब मुर्दे बोले ‘सबकुछ चंगा-चंगा’,
सा’ब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा
ख़तम हुए समशान तुम्हारे
ख़तम काष्ठ की बोरी
थके हमारे कंधे सारे
आँखे रह गई कोरी
दर-दर जाकर यमदूत खेले
मौत का नाच बेढंगा
सा’ब तुम्हारे रामराज में
शब-वाहिनी गंगा
नित्य निरंतर जलती चिताएं
राहत मांगे पलभर
नित्य निरंतर टुटे चूड़ियाँ
कुटती छाती घर घर
देख लपटों को फ़िडल बजाते वाह रे
‘बिल्ला-रंगा’
सा’ब तुम्हारे रामराज में
शव-वाहिनी गंगा
सा’ब तुम्हारे दिव्य वस्त्र
दिव्यत् तुम्हारी ज्योति
काश असलियत लोग समझते
हो तुम पत्थर, ना मोती
हो हिम्मत तो आके बोलो
‘मेरा साहब नंगा’
सा’ब तुम्हारे रामराज में
शव-वाहिनी गंगा.
मूळ गुजराती कविता – कवयित्री पारुल खक्कर
हिंदू अनुवाद – इलियास