राज्यात ४ मे पासून मशिदीवरील भोंग्यावर अजाण वाजली, तर त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर पोलिस विभागाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना अटक झाली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनाही अटक करण्यासाठी प्रक्रिया सुरु असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर सदर पत्र पोस्ट केले आहे. यात त्यांनी राज्य सरकारला खरमरीत इशारा दिला आहे. “राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!”
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022