राज्यपाल हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री असतात असा समज आहे. त्यांचा लवाजमा हा एखाद्या मुख्यमंत्र्यासारखाच असतो. याचे चित्र आज नांदेड येथे पहालया मिळाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नांदेड दौऱ्यावर असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी संपूर्ण दुकाने संयाकाळी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाने व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे.
राज्यपाल महोदयांच्या या दौऱ्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरतर या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारची पूर्णपणे नापसंती असूनही राज्यपालांनी हा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर राज्यपाल आहेत हे त्यांनी समजून घ्यावे अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टिका केली. तरीदेखील या दौऱ्याला राज्यपालांनी पसंती दाखवली आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना काळात व्यापारी वर्ग पूरता खचला आहे. त्यातच दुकाने उघडण्यावर शासनाकडून लावण्यात आलेली बंधने ही वेगळी अडचण असताना आता राज्यपालांच्य दौऱ्यात दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले गेल्याने व्यापारी वर्ग हा संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.