प्रयागराज येथे आयोजित सभेस संबोधित करताना नितीन गडकरी
उत्तरप्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि साऱ्या पक्षांतर्फे प्रचारसुद्धा दणक्यात सुरु आहे. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्र सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज एक भव्य प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेस संबोधताना गडकरी म्हणाले कि, माझी अशी इच्छा आहे की येत्या काळात प्रयागराजमध्ये सी-प्लेन उतरावा. त्याचसोबत त्यांनी सांगितले की, माझ्या मंत्रालयाकडे पैशाची काहीच कमतरता नाही, कोट्यवधींची कामे आपण आतापर्यंत केली आहेत.
महत्वाची बाब म्हणजे पुढे ते म्हणाले की, “आपण लवकरच प्रयागराज मध्ये हवेत उडणाऱ्या बसेस चालू करणार आहोत आणि सदर योजनेचा डीपीआर आपण बनवत आहोत. माझ्याकडे पैशाची काही कमी नाही, मी कोटींमध्ये वार्ता करतो. त्यामुळे हे स्वप्न तुम्हाला सत्यात उतरावयचे असेल तर या निवडणुकीत आम्हाला निवडून द्या.”
लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, “जेव्हा उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता होती ते ५०० कोटींचे रस्ते तरी बनवले का? प्रयागराजच्या फामऊ मध्ये फेब्रुवारी २०२४ पर्यंत दोन हजार कोटींच्या प्रकल्पातंर्गत ६ पदरी उड्डाणपुल बांधला जाईल. हा उड्डाणपुल पाहण्यासाठी अगदी परदेशातून सुद्धा लोक येतील. सदर पुलावर आपण एक फिरते रेस्टॉरंट बनवण्यात येईल ज्याला एक प्रेक्षादालन सुद्धा असेल.”
या सभेनंतर गडकरींनी प्रयागराज मधल्या भाजप मीडिया केंद्राचे उद्धाटन केले. त्यावेळेस घेण्यात आलेल्या प्रेसमध्ये ते म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत तीन लाख कोटींची काम केली आहेत आणि येत्या ५ वर्षात पाच लाख कोटींची कामसुद्धा प्रगतीपथावर करू. जेव्हा ही कामे प्रत्यक्षात उभी राहतील तेव्हा उत्तर प्रदेशातील रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसमान असतील.
भाजप पक्ष उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावत आहे. सत्तेत येण्यासाठी आपल्या शक्तीबळावर लक्षकेंद्रीत करत आहे. गडकरींच्या या व्यक्तव्यानंतर उत्तर प्रदेशची जनता त्यांना निवडून देणार की नाही हे येत्या काळात कळेतच मात्र महाराष्ट्रात चर्चा तर होणारच…