बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकासाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून याच्या आगामी ‘राम सेतू’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील अक्षयची भूमिका आणि त्याचा लूक कसा असेल याची चाहत्यांना फारच उत्सुकता लागली होती. अखेर आता स्वत: अक्षयनेच इन्स्टाग्रामवर रामसेतूमधील आपला लूक शेअर केला आहे. याशिवाय आपल्या लूकबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्नही त्याने चाहत्यांना विचारला आहे.
View this post on Instagram
अक्षयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात केली आहे. मात्र या चित्रपटातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. चित्रपटात अक्षय ऑर्किओलॉजिस्टची म्हणजेच पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात तो भारत व श्रीलंका यांमधील असलेला रामसेतूचे वास्तव शोधताना दाखवला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना अक्षयने त्याच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी रामसेतू हा एक चित्रपट असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात केली असल्याचेही त्याने या पोस्टमधून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.
आज श्री अयोध्या जी में फ़िल्म “रामसेतु” के शुभारंभ पर भगवान श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ।
जय श्री राम!#RamSetu @Asli_Jacqueline @Nushrratt @Abundantia_Ent @LycaProductions @primevideoin @vikramix @ShikhaaSharma03#AbhishekSharma#DrChandraprakashDwivedi#CapeOfGoodFilms pic.twitter.com/4VRi6rs58B— Akshay Kumar (@akshaykumar) March 18, 2021
गेल्या आठवड्यात या चित्रपटाच्या मुहुर्त शूटींगसाठी चित्रपटाची संपूर्ण टीम अयोध्याला पोहचली होती. यावेळी त्यांने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. अक्षयसोबत या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस आणि नुसरत भरूचा या देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक शर्मा हे करत आहेत. याचे चित्रिकरण मुंबईसह उत्तरप्रदेशातील अयोध्या आणि इतर ठिकाणी होणार आहे.