Home Uncategorized कोरोनाची धास्ती; बिहारमधल्या वृद्धाने घेतली १२ वेळा लस

कोरोनाची धास्ती; बिहारमधल्या वृद्धाने घेतली १२ वेळा लस

तब्बल १२ वेळा घेतला कोरोनाच्या लसीचा डोस, डोस घेण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

151
0

बिहारमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. बिहारमधील ८४ वर्षीय वृद्ध असलेले ब्रह्मदेव मंडल यांनी तब्बल १२ वेळा कोरोनाची लस घेतली आहे. १२ वेळा लसीकरणासाठी त्यांनी वेगवेगळी शक्कल लढवली आहे. या बाबत बिहारच्या आरोग्य विभागाला थांबपत्ताच नाही. त्यामुळे बिहाराच्या आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रह्मदेव मंडल यांनी १२ वेळा कोरोनाती लस घेतली. लस घेतल्यानंतर शारिरीक व्याधीपासून आराम मिळाला आहे, असा दावा या वृद्धाने केला आहे. हा प्रकार उघडीस आल्यानंतर बिहार आरोग्य विभागाचे सचिव या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली. नियमाप्रमाणे एका व्यक्तीला केवळ दोनच लसीचे डोस दिले जातात. असे असताना या वृद्धाला १२ डोस कसे मिळाले, याची सत्यता पडताळून पाहण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.

 

वृद्धाने कशाप्रकारे १२ वेळा लस घेतली

ब्रह्मदेव मंडल या वृद्धाने लसीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आधार व वोटर आयडीचा वापर केला. सर्वात आश्चार्यचकीत बाब म्हणजे या वृद्धाचे आतापर्यंत लसीकरणाचे प्रमाणपत्र तयार झाले नाही.

या वृद्धाने सर्वप्रथम ११ महिनापूर्वी पहिला लसीचा डोस घेतला. दुसरा डोस १३ मार्च २०२१ तर तिसरा डोस १९ मे २०२१ रोजी घेतला होता. तर १२ वा डोस दोन दिवसापूर्वी घेतला आहे. १२ डोस घेऊन देखील या वृद्धाची माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडे नाही. तसेच या वृद्धाने लसीकरणासाठी दरवेळी वेगवेगळे मोबाईल नंबर वापरले आहेत. सध्या या प्रकरणाची बिहार आरोग्य विभाग चौकशी करत असून या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Previous articleपोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती Axis बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना कोर्टाची नोटीस
Next articleऑनलाईन परीक्षेचा सेटलमेंट बादशाह राज तेवतियाला अखेर बेड्या ठोकल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here