ज्या नागरिकांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले त्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. नागरिकांकडे दोन लसींकरणाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. आतापर्यंत हे लसीकरण प्रमाणपत्र कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपवरुन डाऊनलाोड करता येत होते. परंतु आता हे प्रमाण व्हॉट्सअॅपवरून उपलब्ध होणार आहे. भारत सरकारने व्हॉट्सअॅप सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र काही सेकंदात व्हॉट्सअॅपवर डाऊनलोड करता येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
बाहेर कुठेही फिरायला जायचे असेल, लसीकरण प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. लसीकरण झाल्यावर हे प्रमाणपत्र कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपवरून नागरिकांना डाऊनलोड करता येत होते. पण आता हे प्रमाणपत्र व्हॉट्सअॅपवरून ही डाऊनलोड करता येणार आहे. या करिता केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
व्हॉट्सअॅपवर असे मिळवता येईल प्रमाणपत्र
नागरिकांना सर्वप्रथम स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये मायजीओवी (MyGov)हेल्पडेस्कचा व्हॉट्सअॅप क्रमांक ९०१३१५१५१५ सेव्ह करावा. त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून सर्चमध्ये हेल्पडेस्कचा नंबर ओपन करावा. तेथे डाऊनलोड सर्टिफिकेट असं टाईप करणे. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटबॉट लसीकरणासाठी नोंदणीकृत केलेल्या मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल. ओटीपी तापासून झाल्यावर एंटर दाबा. यानंतर चॅटबॉट व्हॉट्सअॅपवर करोना लसीकरण प्रमाणपत्र पाठवेल. ते प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतूवरून ही हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.