मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोने, चांदीच्या भावात घट होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. शिवाय रशिया-युक्रेन युद्धही थोड्याफार प्रमाणात निवळत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारातून रिकव्हरी होणार नाही. शिवाय मार्चमध्ये लग्नांचा धुमधडाका नाही. म्हणून ७ मार्च ते ११ मार्चदरम्यान सोने व चांदीच्या भावात घसरण झाली. मार्चमध्ये लग्नांची धामधूम नाही. याचा परिणाम गेल्या आठवड्यात सोने, चांदीच्या किमतींवर पाहायला मिळाला. IBJA कडून प्रकाशित आकड्यानुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १ हजार १०० रुपये प्रती दहा ग्रॅममध्ये घट दिसली. हे आकडे ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स’ असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.
गेल्या आठवड्याभरातील सोन्याचे भाव
७ मार्च : २४ कॅरेट सोन्याची किंमत ५३,५९५ रुपये प्रती १० ग्रॅम होती.
८ मार्च : मंगळवारी सोन्याच्या भावात ४७ रुपयांची घट झाली. ५३,५४८ रुपये प्रती १० ग्रॅम होते.
९ मार्च : बुधवारी सोन्याचा भाव ४०७ रुपये कमी झाला. बुधवारी सोनेबाजार बंद होण्याच्या वेळी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५३,१४१ रुपये प्रती १० ग्रॅम होता.
१० मार्चला : गुरुवारी निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या दिवशी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २६१ रुपयांची घसरण झाली. १० मार्चला सोन्याचे भाव ५२,८८० रुपये प्रती १० ग्रॅम होते.
११ मार्च : आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात ४१८ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ५२,४६२ रुपये प्रती १० ग्रॅम भाव होते.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आकड्यांनुसार ७ ते ११ मार्च या आठवड्यात सोने १,१३३ रुपये प्रती ग्रॅम स्वस्त झाले.
चांदीच्या किमतीतही घसरण
७ मार्च : सोमवारी सोनेबाजारात चांदीची किंमत ७०,५८० रुपये प्रती किलोग्रॅम होती.
८ मार्च : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या किमतीत ३१० रुपये किलोग्रॅम वाढ पाहायला मिळाली.
९ मार्च : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ५६ रुपये प्रती किलोग्रॅम चांदीच्या भावात घसरण झाली. यामुळं बाजारात चांदीची किंमत ७०,३८४ रुपये प्रतीकिलो झाली.
१० मार्च : गुरुवारी चांदीच्या किंमत १,१०९ रुपये कमी होऊन ६९,८१५ रुपये प्रती किलोग्रामवर आली.
११ मार्च : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीची किंमत १०२ रुपये प्रती किलोग्राम घसरली. बाजारात चांदीची किंमत ६९,७१३ रुपये प्रती किलोग्राम होती.
अशाप्रकारे आठवडी बाजारात चांदीची किंमत ८६७ रुपये प्रती किलोग्राम घसरली. हे आकडे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.