Home Uncategorized ऑनलाईन हॅकर्सपासून अकाऊंटमधील पैसे वाचवायचे असतील तर या चार गोष्टींचे करा पालन

ऑनलाईन हॅकर्सपासून अकाऊंटमधील पैसे वाचवायचे असतील तर या चार गोष्टींचे करा पालन

सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची महाराष्ट्रात नोंद

302
0

देशामध्ये लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात फेब्रुवारी २०२१ पर्यंत ३ लाख १७ हजार ४३९ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ५ हजार ७११ एफआयआर नोंदणी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे घडले आहेत. महाराष्ट्रात ५० हजार ८०६ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून ५३४ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रलायाने दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोक सातत्याने कॉप्युटर, लॅपटॉप आणि गॅजेटचा वापर करत असल्याने ते इंटननेटशी जोडले गेले. यामार्फत सायबर गुन्हेगार सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचतात. पण इंटरनेट युझर्सने थोडी दक्षता घेतली, इंटरनेटद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतात. महाराष्ट्र सायबर पोलिस सेलने ट्विटरवर सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे.

इंटरनेट बँकिंगसाठी केवळ स्वतःचा मोबाईल, लॅपटॉप आणि कॉप्युटरचा वापर करावा. त्यावरून लॉगिन करावे.

ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःची माहिती देताना खूप विचारपूर्वक भरावी. माहिती भरताना ती वेबसाईट अचूक आहे का ? याची खातर जमा करावी. काही वेळेस चुकीच्या वेबसाईटवर स्वतःचे वैयक्तिक माहिती शेअर झाल्याने फार मोठे नुकसान होते.

सोशल मीडिया वर आपले वैयक्तिक माहिती आणि फोटो उपलब्ध असतात. त्यामुळे सोशल मीडिया अकाऊंटचे लॉगिन वैयक्तिक डिव्हाईसवरुन करावे. प्रत्येक वापरानंतर आठवणीने सोशल मीडिया अकाऊंट लॉगाऊट करावे.

एसएसएस , ईमेल या सोशल मीडियामधून मिळणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून टाळा. अशा संशयास्पद लिंकद्वारे सायबर गुन्हेगार तुमच्या डिव्हाईसचा एक्सेस घेऊ शकतात. स्वतःच्या बँक खात्याचे स्टेटमेंट वारंवार तपासत राहणे, जर स्टेटमेंटमध्ये काही चुकीचे वाटल्यास लगेच तक्रार करा. २ फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवायला विसरू नका.

Previous articleव्हॉट्सअ‍ॅपवरून डाऊनलोड करा लसीकरण प्रमाणपत्र
Next articleOne Plus च्या फोन चाहत्यांना धोक्याची घंटा, NORD 2 पुन्हा फुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here