भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला आता चांगली संधी चालून आहे. भारतीय नौदलामध्ये ट्रेडसमन या पदासाठी एकूण १५३१ जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत २० मार्च २०२२ निश्चित करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतेलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. भारतीय नेवल डॉकयार्डच्या स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी देखील अर्ज दाखल करु शकतात. उमेदवारांना २१ फेब्रुवारीपासून https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र आणि शैक्षणिक माहिती सोबत ठेवावी. भारतीय नौदलातील या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणं आवश्यक आहे.
पदांची संख्या
भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एकूण १५३१ पदांवर भरती होणार आहे. इंडियन नेव्हीमध्ये ट्रेडसमन विभागामध्ये विविध पदांवर भरती केली जाईल. इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाऊंड्री, पॅटर्न मेकर, आयीसीई फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशिनिस्ट, मिलराईट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, ट्रेलर, वेल्डर, रडार फिटर, रेडिओ फिटर, रिगर, शिपराईट, ब्लॅकस्मिथ, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, जायरो फिटर, मशिनिरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, आयसीईटी फिटर क्रेन या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
अर्ज कसा दाखल करायचा
स्टेप १ : जॉऊन इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट द्या.
स्टेप २ : वेबसाईटवरील करियर अँड जॉब्स ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप ३ :आता ट्रेडसमन भरती ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप ४ : तिथे Register with Aadhaar Virtual ID वर क्लिक करा.
स्टेप ५ : आता नोंदणीमधील सर्व माहिती भरा.
स्टेप ६ : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज दाखल करा.
स्टेप ७ : जॉईन इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा.
वयोमर्यादा नेमकी किती?
भारतीय नौदलातालील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराचं वय १८ ते २५ च्या दरम्यान असावं.
निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
वेतन किती मिळणार?
भारतीय नौदलाता ट्रेडसमन पदासाठी १९,००० ते ६३,००० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज कुठे करायचा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार २१ फेब्रुवारी पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.