भारताने इंग्लंडला नमवत U-19 वर्ल्डकपला नमवत जेतेपदावर कब्जा केला. भारताचं या स्पर्धेचं हे पाचवं जेतेपद आहे. या आधी २००० साली मोहम्मद कैफ, २००८ साली विराट कोहली, २०१२ साली उन्मुक्त चांद तर २०१८ साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर १९ क्रिकेट विश्वचषकाचं जेतेपद भूषवलं होतं.
जेतेपदाच्या या वाटचाालीत खेळाडूंच्या मेहनतीला बरोबरीने मेहनतीच्या बरोबरीने प्रशिक्षकांचं योगदानही मोलाचं आहे. ह्रषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतूले या दोन मराठमोळ्या प्रशिक्षकांकडे भारताच्या या युवा संघाची जबाबदारी होती.
६ खेळाडू आढळले होते कोरोना पॉझिटिव्ह
या स्पर्धेदरम्यान भारतीय संघातले एक नव्हे दोन नव्हे तर सहा सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आर्यंलंड आणि युगांडा विरुद्धच्या ११ फिट खेळाडू उपलब्ध होतील कि नाही याविषयी साशंकता होती. मात्र या काळात संघाचं मनोधैर्य खच्ची होऊ न देता उपलब्ध खेळाडूंना हाताशी घेऊन रणनीती आखून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारताने या स्पर्धेच्या सर्वही सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली. ह्रषिकेश कानिटकर-साईराज बहुतुले जोडीने भारतीय संघ मानसिकदृष्ट्या कणखर असेल याची सर्वतोपरी काळजी घेतली.

ह्रषिकेश कानिटकर यांची कारकिर्द
कानिटकर यांनी गोवा संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत कानिटकर यांनी तामिळनाडू संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. तामिळनाडू संघाच्या कामगिरीत अमूलाग्र बदल घडवून आणण्याचं श्रेय कानिटकर यांना जातं.
जेव्हा राहुल द्रविड क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असताना ह्रषिकेश कानिटकर त्यांच्या टीममध्ये बॅटींग कोच म्हणून कार्यरत होते. २०२० सालच्या अंडर १९ वर्ल्डकपवेळी ह्रषिकेश कानिटकर भारतीय संघाचे बॅटींग कोच होते. कानिटकर यांच्या अनुभवाचा युवा भारतीय खेळाडूंना पुरेपूर फायदा झाला आहे.
