Home Uncategorized मंगळावर बंगला बांधायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार… इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लावला नव्या वीटेचा...

मंगळावर बंगला बांधायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार… इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लावला नव्या वीटेचा शोध

362
0

चंद्र आणि मंगळावर मानवी वस्ती केव्हा तयार होणार, या प्रश्नाचं उत्तर मिळायला वेळ जाईल. मात्र या ग्रहांवर माणसं नेमके कसे राहतील, याचा शोध जगातील विविध अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञ गेल्या अनेक दशकांपासून घेत आहेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) आणि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स (IISC) बंगळुरू यांनी संयुक्तपणे नुकतीच अशी वीट निर्माण केली आहे, जिच्या मदतीने मंगळ ग्रहावर इमारती उभारता येणार आहेत. ISRO चे हे संशोधन ‘प्लस वन जर्नल’ (Plus One Journal) या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

कशा प्रकारे बनवण्यात आली ही वीट?

सदर वीट निर्माण करण्यासाठी भारतीय संशोधकांनी बॅक्टेरियावर आधारित तंत्रज्ञानाची मदत घेतली. प्रथम मंगळावरून आणलेल्या मातीला स्पोरोसारसीना पेस्टुरी नावाचा बॅक्टेरिया, ग्वार गम, युरिया आणि निकल क्लोराइडमध्ये मिश्रित केले गेले. त्यानंतर या मिश्रणाला विटेच्या आकाराच्या साच्यामध्ये टाकण्यात आले. काही दिवसांनी बॅक्टेरियाने युरियाला कॅल्शिअम कार्बोनेटच्या क्रिस्टलमध्ये रूपांतरित केले. ज्यामुळे विटेची घनता दबावाने अधिक कठीण झाली.

चंद्रावर वस्ती बनवण्यासाठीही वीट निर्माण करण्यात आली आहे

ISRO आणि IISC च्या वैज्ञानिकांनी ऑगस्ट २०२० मध्ये असाच एक समांतर प्रयोग केला. चंद्रावरून आणलेल्या मातीमध्ये विविध रसायने टाकून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, चंद्रावर तग धरू शकणारी वीट बनवण्यासाठी ज्या प्रक्रियेचा वापर केला जातो, त्यातून फक्त गोलाकार वीट बनवली जाऊ शकते. मात्र या वर्षी शास्त्रज्ञांनी ज्या प्रक्रियेचा वापर केला आहे त्यातून विविध आकाराच्या विटा बनवल्या जाऊ शकतात.

मंगळ्याच्या मातीपासून वीट बनवणं खूप अवघड

IISC च्या मॅकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे साहाय्यक प्राध्यापक आणि संशोधक आलोक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मंगळावरच्या मातीपासून वीट बनवणं खूप अवघड काम होतं. कारण मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये आयर्न ऑक्साइडचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे बॅक्टेरिया त्यांच्यावर जिवंत राहू शकत नाही. याच प्रमुख कारणामुळे मातीला बॅक्टेरिया अनुकूल बनवण्यासाठी त्यात निकल क्लोराइडचे मिश्रण करण्यात आले.

वीटेवर अजून संशोधन सुरु आहे

सद्यस्थितीला शास्त्रज्ञांनी या वीटेचा फक्त एक प्रोटोटाईप बनवला आहे. त्यावर अजून संशोधन करणे बाकी आहे. पुढील संशोधन प्रक्रियेत सदर वीट मंगळाच्या वातावरणात टिकणार की नाही, हे जाणण्याचा प्रयत्न संशोधक करतील. कारण पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या वातावरणात खूप फरक असतो. मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साइड, परक्लोरेट्स याचे प्रमाण जास्त असते आणि गुरुत्वाकर्षण फार कमी असते. ज्यामुळे वीटेच्या प्रगल्भतेसाठी समाविष्ट केलेल्या बॅक्टेरियावर प्रभाव पडू शकतो.

Previous articleआगळावेगळा रेकॉर्ड: ७ वर्षाच्या दिव्यांग मुलाने सर केलं हिमालयातील हे भयानक शिखर!
Next articleअक्रम जगातील चक्रम लोक. हे फोटो पाहून हसू आवरणं कठीणच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here