”बिग बॉस मराठी” मधून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री रूपाली भोसले सध्याच्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ”आई कुठे काय करते” या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे आणखीन नावारूपाला आली. ”बिग बॉस मराठी”च्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे रुपाली भोसले. आता रूपाली आणखी एका कारनाने चर्चेत आली आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मिडियावर रूपालीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

रूपाली नेहमीच तिच्या सोशल मिडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला असून तिच्या या फोटोच्या सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत. रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरीला मंगळसूत्राचा फोटो शेअर केला होता. त्यावर ‘तयारी झाली सुरु’ असे कॅप्शन देखील दिले होते. त्यामुळे रूपाली लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. याबाबतच तिने एका मुलाखतीत खुलासा केला की, ”आमच्या घरी लग्नकार्य नक्कीच आहे. पण लग्न माझं नाही तर माझ्या भावाचे आहे.” असे म्हणत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
View this post on Instagram
रूपाली गेल्या अनेक दिवसांपासून अंकीत मगरे या चित्रपट निर्मात्याला डेट करत आहे. सोशल मिडियावर सतत ती त्याच्यासोबत फोटो शेअर करत असते. त्याना मराठी मनोरंजन क्षेत्रात हे क्युट कपल म्हणून ओळखले जातात. प्रेमात आकंठ बुडालेले हे जोडपे लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.