बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रीपैकी आहे. कंगना त्या कलाकारांपैकी आहे जे आपले मुद्दे ठोसपणे मांडतात. ती नेहमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक विषयावर बोलत असते. याचबरोबर, कंगना नेहमीच इतरांच्या कामाचे कौतुक करण्यात मागे राहत नाही. नुकतेच कंगनाने ‘दंगल’ फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या ‘पगलैट’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे ट्विटरवरून कौतुक केले होते. सान्याचे सध्या तिच्या ‘पगलैट’ या चित्रपटासाठी बरेच कौतुक होत आहे. यावर आता सान्याने कंगनाचे ट्विट वाचल्यानंतर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
नेटल्फिक्स वरील ‘पगलैट’ या चित्रपटातील अभिनाचे ट्विटरवरून तिचे कौतुक केले होते. ‘ती खूप चांगली आहे. मला आनंद झाला आहे की लोक तिच्या टॅलेन्टला ओळखत आहेत. मी ऐकले होते की ‘पगलैट’ चित्रपट खूप चांगला आहे. मी सान्यासाठी खूप आनंदी आहे. तू सर्वकाही डिसर्व्ह करतेस. खूप प्रेम.’ असे ट्विट करत कंगनाने सान्याची स्तुती केली होता. यावर सान्याने खूष होऊन तिची प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.
She is soooo good …. I am gald people are recognising her talent, I heard #PagglaitOnNetflix is doing amazingly well… so happy for you Sanya you deserve everything and much more … lots of love to you ❤️ https://t.co/d5lVvyLbwN
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 30, 2021
एका मुलाखतीत सान्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, ”मी कंगना रनौतची खूप मोठी चाहती आहे. इंडस्ट्रीत माझ्यापेक्षा कंगनाला जास्त अनुभवी आहे. मी केवळ माझ्या ‘दंगल’ चित्रपटाच्या वेळीच नाही तर प्रत्येक मुलाखतीत असेच सांगते की मी तिची खूप मोठी चाहती आहे. ती माझ्या प्रेरणास्थानी आहे. जेव्हा तिने ट्विटरवरून माझे कौतुक केले तेव्हा ते माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक मोठी बातमी होती. ते ट्विट वाचताना माझे हात थरथरत होते. माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. मी तिची खूप आभारी आहे.”
सान्या मल्होत्राने तिच्या अभिनय कारकीर्दीत बर्याच चित्रपटांत काम केले आहे. ती नेहमीच तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी ओळखली जाते. अभिनयाशिवाय सान्या सोशल मिडियावरही तितकीच अॅक्टिव असते.