Home Uncategorized Job Alert : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज…

Job Alert : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज…

205
0

नोकरीच्या शोधात असलेल्या उद्योन्मुख उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने (SECL – South Eastern Coalfields Limited) १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीद्वारे सरफेस मायनर ऑपरेटर पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार १२ एप्रिल २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट secl-cil.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रत जमा करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे. या भरती अंतर्गत अनेक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ मार्च २०२२ पासून सुरू झाली आहे.

या भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा

१) भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरु झाल्याची तारीख : १६ मार्च २०२२

२) अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२२

३) रिक्त जागा – जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गत सरफेस मायनर ऑपरेटरच्या १७ पदांवर भरती केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

अशी असेल निवड प्रकिया?

या भरतीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्र आणि तारीख या संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकता.

Previous articleरिझर्व्ह बँकेने तीन बँकांवर लावला दंड. महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश…
Next articleवाढत्या इंधन दरवाढीतही हमखास वाचवा ४०० रुपये, ही युक्ती नक्कीच कामी येणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here