Home Uncategorized CID मध्ये काम करायची इच्छा? इथे करा अर्ज…

CID मध्ये काम करायची इच्छा? इथे करा अर्ज…

401
0

राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अर्थात सीआयडी (CID) काम करण्याची तुमची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी नक्कीच सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे. तुम्हीही आता सीआयडीमध्ये काम करू शकता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) पद भरण्यात येणार आहे. अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयात विधी अधिकारी (गट-ब) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागू करण्यात आलेल्या अटींमध्ये आणि शैक्षणिक पात्रतेत बसणाऱ्या योग्य उमेदवारांनी अर्ज भरावा. या पदाची जागा ११ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.

पदाचं नाव – विधी अधिकारी (गट-ब), गुन्हे अन्वेषण विभाग पुणे

एकूण पदे – ०१

मासिक वेतन, दूरध्वनी आणि प्रवास खर्च – २५,००० रु. + ३००० रु.

पात्रता

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त कायद्याचा पदवीधर असावा. उमेदवाराचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळणारी व्यक्ती, गुन्हेगारी प्रशासकीय आणि सेवांविषयक कायद्यांविषयी सखोल ज्ञान असणारी व्यक्तीच या पदासाठी पात्र असेल.

कसा करणार अर्ज?

१) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या www.mahacid.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

२) वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला अर्ज भरून तो लिफाफ्यात भरावा.

३) लिफाफ्याच्या उजव्या बाजूला ठळक अक्षरात ” कंत्राटी विधी संवर्गाच्या पदांसाठी अर्ज” असं लिहा.

४) हा अर्ज २० एप्रिल २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत ) खालील पत्त्यावर पोहचेल याची दक्षता घ्यावी.

पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी, चव्हाणनगर, पुणे- ४११००८

महत्त्वाचे

१) २० एप्रिल २०२२ ला म्हणजेच शेवटच्या तारखेला सांयकाळी ०६.१५ नंतर आलेला अर्ज कोणत्याही परिस्थिती स्वीकारला जाणार नाही.

२) आपल्या अर्जात दूरध्वनी क्रमांक, इमेल आयडी आणि आपला पत्ता नमूद करावा.

३) पदासाठीची शैक्षणिक पात्रता, अनुभव, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या त्याचबरोबर अर्जदाराने अर्जासोबत द्यायचे प्रतिज्ञापत्र याबाबतची सविस्तर माहिती www.mahacid.gov.in या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Previous articleवाढत्या इंधन दरवाढीतही हमखास वाचवा ४०० रुपये, ही युक्ती नक्कीच कामी येणार!
Next articleउत्तर प्रदेशात आता लिंबूचोरांची दहशत. शहाजहांपूरच्या बाजारात चक्क ६० किलो लिंबूंची चोरी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here