Home Uncategorized WhatsApp Update: व्हॉटसॲपवर आता अख्खा सिनेमा पाठवता येणार

WhatsApp Update: व्हॉटसॲपवर आता अख्खा सिनेमा पाठवता येणार

222
0

व्हॉटसॲपद्वारे अधिकृतरीत्या सांगण्यात आलयं की, स्मार्टफोनधारकांसाठी काही नवीन फीचर्स २०२२ सालामध्ये सुरू करण्यात येणार आहेत. META कंपनीचे हे इन्स्टण्ट मेसेजिंग ॲप कोट्यवधी युजर्सच्या अनुभवाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी नवीन नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते.

जाणून घेऊया या वर्षात येणाऱ्या पाच नवीन फीचर्सबद्दल…

१) व्हॉटसॲप कम्युनिटी

या फीचरद्वारे आपल्या सामायिक आवड म्हणजेच कॉमन इंटरेस्ट असणाऱ्या ग्रुपशी कनेक्ट होऊ शकता. व्हॉटसॲपने इथे हायलाइट केलंय की याद्वारे युजर्स हे बिल्डिंग, लोकल रेस्टॉरंट, सिटी स्कूल पेरेण्ट्स आणि अशाच दुसऱ्या गृप्सना बिल्ड करू शकतात.

Community संदर्भात कंपनीने सांगितलंय की, याचं इण्टरफेस अजून फायनल झालेले नाही, मात्र याचं डिझाइन आता अस्तित्वात असलेल्या गृप्सप्रमाणे असू शकतं.

२) मोठ्या साइजच्या फाइलही आरामात सेण्ड करता येणार

व्हॉटसॲपद्वारे फाइल शेअरिंग लिमिट लवकरच वाढवण्यात येणार आहे. या फीचरला सिलेक्टेड युजर्स सोबतही टेस्ट केले जाऊ शकते. यात फाइल शेअरिंग लिमिटला १०० एमबीपासून वाढवून दोन जीबीपर्यंत केले जाऊ शकते. त्यामुळे अख्खा सिनेमाही आता व्हॉटसॲपद्वारे सहज पाठवता येणार आहे.

३) WhatsApp Audio Calls मध्ये ३२ सदस्यांचा समावेश

व्हॉटसॲपद्वारे करण्यात येणाऱ्या ऑडिओ कॉलमध्ये आता एकत्रितरीत्या ३२ जणांशी संवाद करणे शक्य आहे. सध्या व्हॉटसॲपद्वारे फक्त ८ लोकांशीच ऑडियो कॉल केला जाऊ शकतो. यावर्षात सदर फीचरद्वारे त्यात बदल होणार आहे.

४) गृप ॲडमिनला जास्त ताकद मिळणार

Whatsapp द्वारे गृप्ससाठी जास्त ऑप्शन्स आणि कण्ट्रोल्स आणले जाणार आहेत. याद्वारे व्हॉटसॲप गृप ॲडमिनला जास्त नियंत्रण करता येणार आहे. याद्वारे गृप ॲडमिन गृपमध्ये एखाद्या युजरद्वारे पाठवलेला डिलिटसुद्धा करू शकतो.

५) लाइव्ह इमोजी रिॲक्शन

व्हॉटसॲपद्वारे लवकरच लाइव्ह इमोजी रिॲक्शन सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात कंपनीद्वारे खूप दिवसांपासून संशोधन सुरू आहे. या लाइव्ह इमोजी रिॲक्शनची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही. मात्र असं सांगण्यात येतंय की या वर्षाच्या अखेरीस हे फीचर लागू करण्यात येईल. ज्याद्वारे युजर्स लाइव्ह इमोजीद्वारे रिॲक्ट करू शकतात.

Previous articleसावधान! भारतात नव्या कोरोना व्हेरियंटची एन्ट्री…
Next articleडॉ. माळशिकारे यांना २२ वर्षांनी शरद पवार का आठवले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here