Home व्हिडिओ ‘देवमाणूस’ मालिकेत एन्ट्री केलेली नेहा खान आहे तरी कोण ?

‘देवमाणूस’ मालिकेत एन्ट्री केलेली नेहा खान आहे तरी कोण ?

930
0

‘देवमाणूस’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडतेय. यातील सर्वच पात्रांचे प्रेक्षक फारच कौतुक करत आहेत. मालिकेतील मुख्य पात्र असलेला डॉक्टर त्याच्या रस्त्यात जो कोणी येतो त्याला तो संपवतो. डॉक्टर व्यतिरिक्त या मालिकेतील गाजलेलं पात्र म्हणजे मंजुळा. पण मुंजळाला देखील डॉक्टरने खुन केला आहे. त्यामुळे आता तिचीही मालिकेतून एक्झिट झालेली आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. मालिकेत एका नव्या नटीची एंट्री झाली आहे. पण इतरांपेक्षा ही एंट्री काहीशी वेगळी आहे. मालिकाचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री झाली आहे. मालिकेत आता दिव्याची एंट्री झाली आहे. दिव्याची व्यक्तिरेखा इतर व्यक्तिरेखांच्या मानाने फारच स्टाईलिश आहे. दिव्याच्या या बोल्ड अंदाजाची गावात चांगलीच चर्चा रंगली. त्यामुळे डॉक्टरलाही आता त्याचं पुढचं सावज मिळालं आहे. दिव्या ही पेशाने पोलीस असून तिचं आता मंजुळाच्या प्रकरणाचा तपास करणार असल्यामुळे डॉक्टर आता घाबरला आहे. पण यावेळी देखील डॉक्टर यातून कसा वाचतो? हे पुढील भागत आपल्याला पाहायला मिळेलच.

तर आपण आता जाणून घेणार आहोत दिव्या म्हणजेच हे भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खानबद्दल… दिव्याचे पात्र रंगवणारी ही अभिनेत्री एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने बऱ्याच मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती मुळची अमरावतीची आहे. आठव्या वर्गात शिकत असतानाच ती मॉडेलिंगच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तसेच वयाच्या पंधराव्या वर्षी ती ‘प्रिंसेस ऑफ महाराष्ट्र’ ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हापासूनच तिने तिला अभिनेत्री व्हायचयं हे ठरवले होते. २०१४ साली तिने ‘बॅड गर्ल’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. मात्र नेहाचा ‘शिकारी’ हा मराठी चित्रपट फारच लक्षवेधी ठरला. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच्या चांगलाच पसंतीस पडला. यात तिने बोल्ड भूमिका साकारली होती. ‘शिकारी’ चित्रपटानंतर तिने ‘काळे धंदे’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले. या वेबसीरिजमध्ये तिच्या कामचं फारच कौतुक झाले होते. याशिवाय नुकतीच ती ‘युवा डान्सिंग क्वीन’ या मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. यामध्ये तिच्या नृत्यकौशल्याची झलक प्रेक्षकांना पाहायली मिळाली. 

आताही ‘देवमाणूस’ या मालिकेत ती वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या नेहा मालिकेत बोल्ड, डॅशिंग आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.

Previous articleधक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या
Next article‘कोरोनिल’चे प्रमोशन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पडले महागात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here