Home व्हिडिओ महिला सावकाराकडून संतापजनक प्रकार, व्याज वसुलीसाठी महिलेला अमानुष मारहाण

महिला सावकाराकडून संतापजनक प्रकार, व्याज वसुलीसाठी महिलेला अमानुष मारहाण

नाशिकच्या नांदगाव येथील पिंपाळे येथे व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने कायदा हाती घेतला आहे. पैसे घेतलेल्या महीला व पुरुषाला सावकार महीलेने जबर मारहाण केली.

360
0

व्याजावर कर्ज घेतल्यावर पैसे वेळेत न दिल्याने ते वसूल करण्यासाठी महिला सावकाराने दंबगगिरी केली. महिला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडलीये.

नाशिकच्या नांदगाव येथील पिंपाळे येथे व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने कायदा हाती घेतला आहे. पैसे घेतलेल्या महीला व पुरुषाला सावकार महीलेने जबर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीसांनी घटनेची दखल घेऊन सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार नांदगावमधील प्रिंप्राळे येथे एका गरीब दाम्पत्याने संगीता वाघ या महिला सावकाराकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती. मात्र, परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मूळ किंमत अजून शिल्लक असल्याचा दावा संगीता वाघ या महिलेने केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेली महिला आणि एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा सर्व स्तरावर संताप व्यक्त होतोय.

Previous articleऍडव्हेंचर कॉमेडी ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित
Next articleरश्मी शुक्ला यांची वकिली कशासाठी? – विजय चोरमारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here